
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेला व राजकीय पक्षांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीता.महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभानिवडणूक असेल. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांमधील फुटलेले गट हे सत्ताधारी भाजपा महायुतीमध्ये आहेत. तर पक्षाध्यक्षांचेगट हे विरोधकांसोबत महाविकास आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व काँग्रेस हे दोन पक्ष सोडले तरनिवडणुकीच्या रिंगणातील इतर चारही प्रमुख पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार गट, उबाठा गट व शिवसेना शिंदे गट हे आपापसांतच राजकीय लढा देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय महाराष्ट्रनवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, वंचित बहुजन आघाडी अशा इतर पक्षांमुळेहीयंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय एमआयएम पक्षानंही आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्टकेल्या आहेत.
Table of Contents
- महाराष्ट्रात पहिली निवडणूक संयुक्त मुंबई प्रांतात झाली
- महाराष्ट्र व गुजरातमधील मिळून ही निवडणूक पार पडली
- काँग्रेसनं २६४ पैकी १३५ जागा जिंकून ही निवडणूक जिंकली
- यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

- महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर झालेली पहिली स्वतंत्र निवडणूक
- २६४ पैकी तब्बल ८१ टक्के अर्थात २१५ जागा जिंकून काँग्रेस सत्तेत
- राज्याचं नेतृत्वबदल, यशवंतराव चव्हाण यांच्याजागी मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्रीपदी
- मारोतराव कन्नमवार यांच्या अकाली निधनानंतर नेतृत्व वसंतराव नाईक यांच्याकडे गेलं

- राज्य विधानसभेतील जागा २६४ वरून २७४ पर्यंत वाढल्या
- नेहरू, शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधींच्या रुपात केंद्रात काँग्रेसमध्येनेतृत्वबदल
- काँग्रेसच्या १२ जागा घटल्या, २०३ आमदारांनिशी सत्ता स्थापन
- जनसंघाचं राज्यातलं पहिलं मोठं यश, ४ आमदार विधानसभेत

- महाराष्ट्रात काँग्रेसचा विक्रमी २२२ जागांवर विजय
- बांगलादेश युद्धातील विजयाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुका
- शिवसेनेचा उदय, विधानसभेतलं पहिलं यश
- पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातून काँग्रेसला सर्वाधिक १३० जागा

- आणीबाणी व काँग्रेसमधील राष्ट्रीय फुटीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक
- शरद पवारांचा ‘पुलोद’ प्रयोग, ३८व्या वर्षीच मुख्यमंत्रीपदी
- महाराष्ट्रात पहिल्यांदाच मूळ काँग्रेस सरकारमधून बाहेर
- सरकारमध्ये पवारांची समाजवादी काँग्रेस, शेकाप व कम्युनिस्ट पक्षांची मोट

- केंद्रात व काँग्रेसमध्येही इंदिरा युगाची पुन्हा नांदी
- केंद्रात सत्ताबदल, राज्यात पुलोद सरकार बरखास्त
- काँग्रेसचेच आजी-माजी नेते सभागृहात आमने-सामने, ए. आर. अंतुले मुख्यमंत्री तर शरद पवारविरोधी पक्षनेते
- पाच वर्षांत चार मुख्यमंत्री – ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर,वसंतदादा पाटील

- इंदिरा गाधींच्या हत्येनंतरच्या निवडणुका, काँग्रेसची पीछेहाट
- काँग्रेसच्या २५ जागा घटल्या, पण १६१ जागांनिशी सत्ता मिळाली
- मशाल चिन्हावर शिवसेनेकडून निवडून येणारे छगन भुजबळ पहिले आमदार
- पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेसचं संख्याबळ घटलं

- शरद पवारांची समाजवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन
- १६१ आमदारांच्या बहुमतावर शरद पवार पुन्हा मुख्यमंत्रीपदी
- शिवसेना (५२)-भाजपाचं (४२) मराठवाडा व प. महाराष्ट्रात प्राबल्य वाढलं.
- मनोहर जोशींच्या रुपाने राज्यात पहिल्यांदाच शिवसेनेचा विरोधी पक्षनेता

- राज्यात पहिल्यांदाच दोन टप्प्यांत मतदान
- महाराष्ट्रातील पहिलं बिगर काँग्रेस व पहिलं सेना-भाजपा युतीचं सरकार
- काँग्रेसची पहिल्यांदाच १०० जागांच्या खाली पीछेहाट
- मनोहर जोशी युतीचे पहिले मुख्यमंत्री

- राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म, दोन काँग्रेस विरुद्ध युती सामना
- शरद पवारांची काँग्रेसशी निकालोत्तर आघाडी, विलासराव देशमुख मुख्यमंत्री
- नारायण राणे पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत
- राज्यात पहिल्यांदाच दोन तुल्यबळ आघाड्या विधानसभेत आमने-सामने

- केंद्रात इंडिया शायनिंग निष्प्रभ, सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पुनरागमन
- राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षाला राज्यात सर्वाधिक ७१ जागा
- काँग्रेसला कमी जागा मिळूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडलं
- प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीनं बस्तान बसवलं, काँग्रेसला विदर्भात भाजपाचं कडवं आव्हान

- २००८ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतरची पहिली निवडणूक
- राज्यात सेना-भाजपा व काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच तिसरा भिडू मनसेचा जन्म
- पहिल्याच निवडणुकीत मनसेची मुसंडी, १३ आमदार विधानसभेत
- अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार

- केंद्रातील मोदी लाटेत राज्यातलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकारही पराभूत
- राज्यात भाजपाला तोपर्यंतच्या सर्वाधिक १२२ जागा, देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाचमुख्यमंत्रीपदी
- विरोधात लढूनही शरद पवारांचा सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा
- २००९ मधील मनसेचा प्रभाव ओसरला, एकच उमेदवार विजयी

- तुफान राजकीय धुमश्चक्रीचा काळ, सेना भाजपाला बहुमत, पण युती तुटली
- फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, सर्वात कमी काळाचं सरकार!
- शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी, सत्तास्थापन
- ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला

- डीबीटी आणि अन्न सुरक्षा कायदा लागू
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन
- लोकपाल विधेयक पारित झालं
- २ जी घोटाळा उघड झाला

- काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदी लागू
- देशभरात जीएसटी लागू
- नीति आयोगाची स्थापना आणि सामान्यांची जनधन खाती उघडली
- पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

- काश्मीरमधून कलम ३७० हटवलं
- देशाला मिळालं नवीन संसद भवन
- महिला आरक्षण विधेयक व सीएए लागू
- राम मंदिराचं बांधकाम


इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ई.वी.एम.)

- पहिल्यांदा कधी वापर झाला१९८२, केरळ विधानसभा निवडणूक
- एका ईव्हीएममध्ये किती नावं नोंद होऊ शकतात64
- कोण बनवतं ही यंत्रेइलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगलुरू आणि इलेक्ट्रॉनिक्सकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) हैदराबाद
- यावेळी किती ईव्हीएम यंत्रांचा वापर होईल५५ लाख
- एका ईव्हीएमची किंमत किती७९०० रुपये